मुक्ताईनगर- अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने भुसावळ येथील नारायण बाबूराव झिने (46, झेडटीएस) यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रक्षा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी रात्री उशिरा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.