अज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळातीतील दुचाकीस्वार ठार

0

फेकरीजवळ अपघात ; तालुका पोलिसात अपघाताचा गुन्हा

भुसावळ- अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने भुसावळातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी साडेनऊ वाजेनंतर फेकरी गावाकडे जाणार्‍या जुन्या रस्त्यावर घडली. या अपघातात क्लीस्टीन वीटर गावंडे (26, रा.लिंम्पस क्लब, भुसावळ) या युवकाचा मृत्यू झाला. क्लीस्टीन हा दुचाकी (एम.एच.19 एडब्ल्यू.1753) ने जात असताना अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ज्यूट वीटर गावंडे (20, रा.लिंम्पस क्लब, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रफिक काझी करीत आहेत.