अज्ञात वाहनाच्या धडकेत मुक्ताईनगरातील तरुणाचा मृत्यू

0

मुक्ताईनगर- अज्ञात वाहनाचे धडकेने मुक्ताईनगर येथील जुनेगावातील दुचाकीवरील 32 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना 21 रोजी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक 46 वरील कोथळी बायपास रस्त्यावर घडली. जुने गावातील काझीपुरा भागातील रहिवासी सैय्यद हसन सैय्यद नुरा (32) हा दुचाकी (एम.एच.19 बी.एक्स.5480) ने भुसावळहुन मुक्ताईनगरकडे येत असतांना तालुक्यातील कोथळी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सैय्यद हसन हा ठार झाला. याप्रकरणी सैय्यद जमील सै.नजीर यांचे फिर्यादिवरून पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहेत.