फैजपूर- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रावेर तालुक्यातील रणगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री 12 वाजता हॉटेल सहाराजवळ ही घटना घडली. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने पळ काढला. रणगाव येथील राजू भास्कर कोळी (45) हे दुचाकीने घरी जात असताना हॉटेल सहाराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत फैजपूर पोलिसात दिलीप भागवत कोळी (40, पाडळसा, ता.यावल) यांनी खबर दिल्यावरून मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.