अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

0

फैजपूर । पिळोदा येथील रहिवासी कैलास गोपाळ कोळी (वय 40) हे सरपण विक्रीचे काम करतात नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास सायकलीवर सरपण घेऊन जात असताना अंजाळे येथील रस्त्यावरील इलेक्ट्रीक डिपी जवळ यावलकडून भुसावळकडे जाणार्‍या अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या सायकलीस मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कैलास कोळी यांच्या पाय व डोक्यास मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संंबंधीत वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मयताचा भाऊ सुनिल कोळी याला मिळालेल्या माहितीनुसार त्याने घटनास्थळी पोहोचला तेव्हा अकलूद येथील पोलीस पाटील यांनी फैजपूर पोलीस स्थानकात संपर्क साधल्यानंतर पोलीसांनी मयतास गाडीत टाकून यावल येथील रुग्णालयात नेले. फैजपूर पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.