अज्ञात वाहनाच्या धडकेत सौखेड्याचा इसम ठार

0

भुसावळ : यावल तालुक्यातील सौखेडा येथील रहिवासी असलेल्या इसमास अज्ञात वाहनाने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 20 रोजी रात्री एक वाजेपूर्वी नायगाव-वडरी रस्त्यावर हा अपघात झाला.

जुम्मा अकबर तडवी (32 रा.सौखेडा, ता.यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यास दाखल केल्यानंतर डॉ.दिनेश देवराज यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अपघातासंदर्भात अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर मोरे करीत आहेत.