मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रांतर्गत डोलारखेडा वन परीमंडळातील डोलारखेडा फाट्याजवळ असलेल्या मलकापूर-बर्हाणपुर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काळवीट जातीचे हरीण ठार झाले. ही घटना बुधवार, 15 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वनहद्दीलगत असलेल्या या महामार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते त्यातच वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणावर या भागात अधिवास असून वन्यप्राणी रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका असतो. प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली डोलारखेडा वनपाल पी.टी.पाटील, वनरक्षक बी.के.थोरात, वनमजुर अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडला.