चाकण : अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्ता ओलांडणारा पादचारी जागीच ठार झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दिनांक 5 ऑगस्ट रोजी 10.50 वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी गावच्या हद्दीत गवतेवस्ती येथील माउली हॉटेल समोर झाला. मनमोहन उर्फ पंडितभैय्या रामशंकर पांडे ( वय 42, रा. रामदास नथुजी करपे यांच्या खोलीत, कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे, मुळगाव रा. देवरी, ता. कटनी, मध्यप्रदेश ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे हे घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडताना चाकण बाजूकडून पुणे बाजूकडे जाणार्या वाहनाने जोरदार धडक देऊन हा अपघात झाला. याबाबतची फिर्याद रुग्णवाहिका चालक शंकर वजरा लोखंडे, ( वय 19, रा. वैदवाडी, मेदनकरवाडी, चाकण ) यांनी दिली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.