बोहर्डी गावाजवळील घटना; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
वरणगाव । एशिया महामार्गावर येथून जवळच असलेल्या बोहर्डी फाटया नाजिक कोणत्या तरी अज्ञात वाहनाने अज्ञातास 24 शनिवार रोजी मध्यरात्री चिरडल्याची घटना आज 25 रोजी सकाळी उघळकीस आल्याने वरणगाव पोलिसात अज्ञात वाहना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोणत्या तरी वाहनचालकाने त्याचे ताब्यातील वाहन मुक्ताईनगरकडून वरणगावकडे भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थिकडे दुर्लक्ष करीत चालवीत नेवून रस्त्याने जाणार्या वेडसर पादचारी अनोळखी पुरुष नाव गाव ङ्काहित नाही. कारणीभूत होवून अपघाताची खबर देणार एकनाथ वामन पाटील वय 52 धंदा शेती, रा.बोहर्डी ता.भुसावळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनाविरूध्द वरणगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील घटनेचा तपास सपोनि जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनखाली पोहेकॉ रविंद्र बोंडे, गजानन ढाकणे, वाहतूक पोलिस महेंद्र शिंगारे, अजय निकम करीत आहे.