धुळे । तालुक्यातील कापडणे येथील सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले श्रीराम वामन पाटील (बोरसे) यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पिकावर तणनाशक फवारणी करून शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून महसूल विभागाकडे त्यांनी तक्रार दिली आहे.कापडणे येथील श्रीराम पाटील यांचे कापडणे-न्याहळोद शिवारात शेत आहे. ते त्यांच्या पत्नीसह शेती करतात. 1 जूनला येथील शिवारात पावसाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतातील अडीच बिघ्यात मक्याची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. या चिंतेत असताना अज्ञात समाजकंटकाने 9 जुलैला मध्यरात्री फवारणी केली होती. त्यात त्यांच्या त्यांच्या मका पिकाचे नुकसान झाले होते.त्यांच्या शेतात नुकसान करणा-या शेतकर्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला श्रीराम पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून 10 जुलैला गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात महसूल विभागालाही कळविले होते. अखेर गुरुवारी सर्कल विभागाकडून शेतातील पिकाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.
श्रीराम वामन पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी
मंडळ अधिकारी भाग सोनगीर (सर्कल) डी. आर. ठाकूर यांनी रीतसर पंचनामा केला आहे. यावेळी कोतवाल भामरे, आबा पाटील, बारकू पाटील, रवींद्र पाटील, शिवाजी पाटील, जयवंत पाटील, अशोक पाटील, रामकृष्ण पाटील, गोरख बोरसे, पांडुरंग पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. दोन महिन्यांर्पूर्वीही माझ्या शेतावर रात्रीतून ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने पूर्ण तयार शेत भुईसपाट करण्यात आले होते. आता दुसजयांदा याच शेतात दोन महिन्यांनंतर दीड महिन्याच्या अडीच बिगा मका पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारणी केली. दोन्हीही वेळेस मी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करूनही आजपर्यंत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही, असे त्यांनी सांगितले.