पिंपरी-चिंचवड : संस्कार भारती पिंपरी-चिंचवड आरोजित ‘चैत्र पालवी’ हा कार्रक्रम गुढीपाडव्राच्रा दिवशी शाहूनगर, संभाजीनगर रेथे उत्साहात पार पडला. या कार्रक्रमात ज्रेष्ठ बासरीवादक अझरुद्दीन शेख रांच्रा बासरी वादनाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. रावेळी महापालिकेचे सत्ताधारी नेते एकनाथ पवार, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे व नगरसेवक तुषार हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरश खटावकर रांनी संस्कार भारती गीत गाऊन कार्रक्रमाची सुरुवात केली. ज्रेष्ठ बासरी वादक अझरुद्दीन शेख रांनी बनवलेली सर्वात छोटी बासरी 1 इंच तर सर्वात मोठी 12 फूट लांब, रा दोन्ही बासरीवादनाने कार्रक्रम एका वेगळ्राच उंचीवर पोहोचला.
शास्त्रीय संगीताची जुगलबंदी
कार्यक्रमात वरदा वैशंपारन रांनी ओडिसी नृत्र सादर केले. कथ्थक व भरतनाट्यमचे एकत्रित सादरीकरण सारली सोनवणे व दीपा कुलकर्णी रांनी केले. अनुजा हेरेकर व देवश्री आठल्रे रांनी भरतनाट्यममधील पदम ही रचना सादर केली. अनुजा देशपांडे, ऋतुजा गोसावी, साक्षी मुजुमदार, नेहा दाते रांनी कथकमधील ‘तरणा’ करून प्रेक्षकांची दाद मिळवली. सारली काणे रांनी ‘सुंदर ते ध्रान…’ रा अभंगावर भरतनाट्यम रचना सादर केली. कार्रक्रमाचे सूत्रसंचालन मरुरी जेजुरीकर रांनी केले तर विद्या दंडवते, हर्षद कुलकर्णी, धीरज पवार रांनी कार्रक्रमाचे संरोजन केले. संस्कार भारती पिंपरी-चिंचवडचे कार्राध्रक्ष अमित गोरखे रांनी उपस्थितांचे स्वागत केले व सचिव सुमित काटकर रांनी आभार प्रदर्शन केले. मधुरा कुलकर्णी रांनी कार्रक्रमाला साजेशी रांगोळी काढली होती.