अझारेंकाला वाईल्डकार्ड

0

मॅलोर्का । बेलारूसची 27 वर्षीय टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाला पुढील महिन्यात होणार्‍या मॅलोर्का महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्ड दिले आहे. अझारेंका विंबल्डन टेनिस स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्यावर्षी तिने गोंडस मुलाला जन्म दिल्यामुळे ती टेनिसपासून अलिप्त राहिली होती. तिने ब्रिस्बेन, इंडियन वेल्स आणि मियामी टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या. ही स्पर्धा 18 जूनपासून सुरू होईल. तिने दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम मिळविले आहे.