आग्रा – उत्तर प्रदेशमधील विविध नद्यांमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मात्र, अटलजींच्या अस्थी यमुना नदीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही, असा इशारा बजरंग दलने दिला आहे.
यमुना नदीचा आता नाला झाला आहे असे म्हंटले तरी चालेल. आणि ती विसर्जनायोग्य नाही. म्हणूंन अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन यमुने नदीत विसर्जित होणार नाही असे बजरंग दलने स्पष्ट केले आहे. यमुना नदीचा स्वच्छतेसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. यमुनेच्या नाल्यात आम्ही अटलजींच्या अस्थी विसर्जित होऊ देणार नाही, असे बजरंग दलाच्या गोविंद पराशर यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.