अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात

0

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. वाजपेयी यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आल्याची माहिती एम्सचे डॉ.रणदीप गुलेरिया यांनी दिली. डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीत वाजपेयींवर उपचार सुरु आहेत.

भाजपच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही महिन्यांपासून वाजपेयी अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर सरकारी निवासस्थानी डॉक्टरांच्या रेखरेखीत उपचार सुरु होते. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वाजपेयींना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. दरम्यान, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर वाजपेयी यांना सर्वोच्च समजला जाणारा नागरी सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.