अटल आदर्श शिक्षक पुरस्काराचे उद्या वितरण

0

भुसावळ- नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ ‘अटल आदर्श पुरस्कार 2018’ भुसावळ तालुक्यातील 21 शिक्षकांना देण्यात येणार आहे. शहरातील चक्रधर नगरातील रोटरी भवनात दुपारी दोन वाजता होणार्‍या कार्यक्रमास नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव शर्मा, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे तसेच गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आवाहन नरेंद्र मोदी विचारमंचचे तालुकाध्यक्ष नारायण कोळी व शहराध्यक्ष संदीप सुरवाडे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.