अटल भूमिपूजनाला जनआधारच्या फलकाचीच चर्चा

0

भुसावळ : अटल योजनेचे भूमिपूजन शनिवारी होत असल्याने शहरवासीयांसाठी खरे तर हे आनंदपर्व होते मात्र जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेश रस्त्यावरच दर्शनी भागात माजी आमदार संतोष चौधरी यांचे छायाचित्र असलेल्या व आमच्या नियोजनामुळेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात असलेल्या फलकांने कार्यक्रमास येणार्‍या सर्वांचेच लक्ष वेधले गेले.

विशेष म्हणजे या फलकावर जनआधारच्या नगरसेवकांचा नामोल्लेख नसलातरी संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी-माजी नगरसेवक असा उल्लेख असल्याने राजकारण्यांसह उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. भूमिपूजनानंतर झालेल्या कार्यक्रमातही या फलकाचीच चर्चा राहिली. माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी विरोधकांवर योजनेय श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने टिकेची तोफ डागली.