पाचोरा । महाराष्ट्र शासनाच्य सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्याल,भडगाव रोड पाचोरा येथे पाचोरा, भडगाव, जामनेर चाळीसगाव व जळगाव येथील शेतकरी सहकारी संघ व सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन संचालक व सचिव यांचा एकत्रित मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यासाठी पुणे येथून गणेश शिंदे मुख्य प्रचारक (अटल महापणन अभियान) व जळगाव येथील उपनिबंधक बारहाते व साहाय्यक निबंधक भडगाव एस.एफ. गायकवाड, जामनेरचे डी.व्ही.पाटील, चाळीसगावचे ए.डी. जगताप,पाचोराचे सहाय्यक निबंधक पी.एस.पाटोळे पाचोरा शेतकरी सह. संस्थेचे चेअरमन प्रदीप जगतराव पाटील व्हा चेअरमन समाधान परदेशी, संचालक खलील देशमुख व विनायक दिवटे गिरणाई पतसंस्था व मार्केट संचालक सतिष शिंदे रामजी ब्राह्मणे ई प्रमुख पाहुणे उपस्थित होते.