जनआधारच्या नगरसेवकांचा पत्रकार परीषदेत दावा
भुसावळ : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘अटल’ मंजुरीचे खरे श्रेय तत्कालीन सत्ताधार्यांना व माजी आमदार संतोष चौधरींना असल्याचा दावा जनआधारच्या नगरसेवकांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परीषदेत केला. अटलच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पत्रिकेत मुख्याधिकार्यांनी राजशिष्टाचाराचा भंग केला असून मंत्री गिरीश महाजन यांना खालच्या रांगेत तर आमदार संजय सावकारे यांना वरच्या रांगेत स्थान दिल्याने जनआधारच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी हे राजकीय दबावातून काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
या संदर्भात नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मात्र शहराचे विकासाचे मोठे काम होत असताना श्रेयवाद घेण्याचा शुद्रपणा विरोधकांनी चालवला असल्याचे सांगत विकासाच्या वाटेवरून कधीही विचलीत होणार नाही व शहराच्या विकासाचे काम आम्ही निरंतर सुरूच ठेवू, असे सांगितले.