रावेर- तालुक्यातील अटवाडे गावाजवळील स्मशानभूमीजवळ 10 ते 15 ब्रास अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना बुधवारी रात्री 10 ते गुरुवारी सकाळी आठ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी अटवाडे पोलीस पाटील नगीन साहेबराव कुयटे यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवैधरीत्या उपसा केलेल्या वाळूचा साठा करण्यात आला होता मात्र अज्ञात आरोपींनी 46 हजार 305 रुपये किंमतीची वाळू लांबवली. तपास हवालदार संजय जाधव करीत आहेत.