अटवाडे येथील नदीपात्रात बुडाल्याने बालकाचा मृत्यू

0

रावेर- तालुक्यातील अटवाडे येथील नदीपात्रात पोहताना बुडाल्याने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. नितेश सुरेश कसबेकर (10) असे मयत बालकाचे नाव आहे. सुरेश गोरेलाल कसबेकर (35, मूळ रा.कालेरपांढरी, ता.खकणार, ह.मु.रा.अटवाडे, ता.रावेर) हे कुटुंबासह मध्यप्रदेशातून कुटुंबाची खळगी भरण्यासाठी अटवाडे येथे आले असून सालदारकीचे काम ते करतात. त्यांचा नितेश नावाचा मुलगा मित्रांसह अटवाडे येथील नदीपात्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी सकाळी 11 वाजता बुडाला. या प्रकरणी रात्री उशिरा रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.