रावेर- तालुक्यातील अटवाडा येथून ट्रॅक्टरचे टिलरचे लोखंडी दोन दात चोरून विकण्याच्या कारणावरुन दोन चोरट्यासह खरेदी करणार्या भंगार विक्रेत्यास रावेर पोलिसांनी अटक केली असल्याने भंगार दुकान चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार विशाल अग्रवाल यांच्या घराजवळ शेतीसाठी लागणारा उपयोगी सामान ठेवलेला असताना ट्रॅक्टर टिलरचे पाच हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी दाते अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक निरीक्षक.आर.बी वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार श्रीराम वानखेडे व निलेश चौधरी यांनी प्रवीण आत्माराम कोळी (30) व संजय नारायण महाजन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी साहित्य खानापूरचा भंगार दुकानदार शे.अफसर शे बाबू या भंगार व्यावसायीकास 400 रुपयात विकल्याची कबुली दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली तर पाच हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. तपास श्रीराम रामदास वानखेडे व निलेश चौधरी करीत आहेत.