अट्टल गुन्हेगार शाम काल्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये पसार असलेला अट्टल आरोपी श्याम सुभाष शिरसाठ उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफुर (पापा नगर, इराणी मोहल्ला, भुसावळ) अखेर मंगळवारी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धत्तीने सापळा रचला होता मात्र संशयीताला त्याचा अंदाज आल्याने त्याने पळ काढला मात्र पोलिसांनी सतर्कता बाळगत त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, एएसआय भरत शिरसाठ, पोलिस हवालदार अनिल खोडके, पांडुरंग वसु, जगदीश ठाकुर, धनराज लुले, अजित तडवी, सागर खंडारे, प्रदीप शेजवळकर, महिला हवालदार संजीवनी तारगे, महिला नाईक गायत्री पोरटे, शिपाई महेश जैन, शिपाई सचिन दैवे आदींच्या पथकाने केली.