जळगाव । शहरातील जीवन नगरात 1 ते 3 एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी करत 39 हजार रुपयांचा सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला आज न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जीवन नगरातील रहिवासी भुषण शांताराम गुरव यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून 1 ते 3 एप्रिल दरम्यान घरात चोरी करत 39 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते.
चोरट्यास न्यायालयात केले हजर
याप्रकरणी गुरव यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी राजेंद्र उर्फ सोफराजा दत्तात्रय गुरव (वय-29 रा. वाघ नगर) यास आज सोमवारी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर त्याला न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्या. कुलकर्णी यांनी सोफराजाला 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.