अट्टल घरफोड्या व चैन चोरट्याला अटक : जळगावातील सात गुन्ह्यांची उकल

जळगावातील सात गुन्ह्यांचा उलगडा ः गोपनीय माहितीवरून कारवाई

जळगाव : दोन घरफोड्यांसह दोन मंगळसूत्र व तीन दुचाकी चोरणार्‍या भामट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने जळगावातील सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे. युसूफ शेख उर्फ चिल्या (शिवाजी नगर, हुडको, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने अन्य तीन अल्पवयीन साथीदारांसह चोर्‍यांसह घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, अशोक महाजन संदीप सावळे, पोलिस नाईक अविनाश देवरे, रवींद्र पाटील, दीपक शिंदे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, सहायक फौजदार राजेंद्र पवार आदींच्या पथकाने ही कारवाई