अट्टल दुचाकी चोरटा शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या 12 दुचाकी जप्त

शिरपूर : मध्यप्रदेश राज्यातील अट्टल चोरट्याच्या ताब्यातून तीन लाख 70 हजार रुपये किमतीच्या 12 दुचाकी शिरपूर शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शिरपूर शहर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना चोरट्याबाबत माहती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील अंजनगाव येथील विकास चंपालाल बर्डे यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शिरपूर तालुक्यासह अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या दुचाकी काढून दिल्या. विविध कंपनीच्या तीन लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, सहा.पोलिस निरीक्षक गणेश फड, पीएसआय किरण बाहे, संदीप मुरकुटे तसेच शोध पथकाचे हवालदार ललित पाटोल, लादूराम चौधरी, गोविंद कोळी, विनोद अखंडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा व आर.सी.पी पथकाचे कॉन्स्टेबल प्रशांत पवार आदींनी केली आहे.