अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक

0

जळगाव – नाशिक शहरातून चोरी केलेली मोटारसायकल पाचोरा तालुक्यातील परीसरात संशयास्पद फिरवतांना आढळून व्यक्तीची चौकशी
केली असता ती चोरीची असल्याचे समोर आले असून मोटारसायकलसह आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील राहणारा आरोपी सुनिल पुजांजी दांडगो (वय-38) ह.मु. वरखेडी
ता.पाचोरा याच्या ताब्यात असलेली मोटारसायकल बजाज 150 मिळून आली असता त्या मोटारसायकल बाबत चौकशी काढली असता
सदरील मोटारसायकल ही नाशिक शहरातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

सदरील मोटारसायलक ही 5 एप्रिल 2018 रोजी रात्री 23.30 ते 06 एप्रिल 2018 सकाळी 10 वाजेदरम्यान स्वप्नअनिता अपार्टमेंट
चैतन्य नगर, विठ्ठल मंगल कार्यालयाशेजारी नाशिक येथून चोरी केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. दरम्यान आरोपी सुनिल दांडगे यांच्या
ताब्यातील मोटारसायकल जमा केली आहे. आरोपीताची सखोल चौकशी चालू असून जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, नाशिक या
शहरातून चोरी केलेल्या मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस येणार आहे.