जळगाव। पाचोरा शहरातील मोबाईल चोरींचा घटनांचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अट्टल मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्याकडून दोन लॅपटॉप, टॅब, विविध कंपनीचे 7 मोबाईल असा एकूण 1 लाख 36 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याशी शक्यता आहे. पाचोरा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता. तर याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा होता. याप्रकरणाचा एलसीबी समांतर तपास करीत होते.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना रविवारी 4 जुन रोजी पाचोर्यातील मोबाईल चोरीच्या घटनांच्या मागे असलेला अट्टल मोबाईल चोरट्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल, नुरोद्दीन शेख, विनोद पाटील, दिलीप येवले, दत्तात्रय बडगुजर, शशिकांत पाटील, संजय सपकाळे, संजय पाटील, सतिष हाळनोर, राजेंद्र पाटील, विजय पाटील, दर्शन ढाकणे, नरेंद्र पाटील, रामचंद्र बोरसे आदींच्या पथकाने पाचोरा शहर गाठत अट्टल मोबाईल चोरटा विक्रम उर्फ बुट्ट्या विनोद अहिरे (वय-29 रा. मच्छीबाजार, बाहेरपुरा) यांची माहिती काढत त्याला सापळा रचून अटक केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अट्टल मोबाईल चोरटा विक्रम याला विचापूस केली असता त्याने चोरी केल्याीच कबूली दिली.
असा मुद्देमाल दिला काढून
अट्टल मोबाईल चोरटा विक्रम उर्फ बुट्ट्या विनोद अहिरे याने चोर्यांची कबूली दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाला चोरी केलेले दोन महागडे लॅपटॉप, एक टॅब तसेच सात वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 1 लाख 36 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. दरम्यान, चोरट्यास न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तर चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याशी शक्यता असून स्थानिक गुन्हे शाखा पथक त्याचा तपास घेत आहेत. यासोतबत विक्रम याच्या साथीदारांच्या शोधार्थ देखील पथक रवाना झाले आहे.