अट्टल मोबाईल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : एरंडोल पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळगावातील तीन चोरट्यांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. मोहमंद अनिस उर्फ मुसा मोहंमंद युसुफ पिंजारी (28, रा. गेंदालाल मिल जळगाव) , मनोज विजय अहीरे (30, गेंदालाल मिल, जळगाव) व रहेमान रमजान पटेल (37, लक्ष्मी नगर, गेंदालाल मील. जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाईल लांबवल्याप्रकरणी दाखल होता गुन्हा
सुमारे एक महिन्यांपुर्वी पारोळा-एरंडोल महामार्गावर रात्रीच्या वेळी एका इसमाकडून मुख्य आरोपी मोहमंद अनिस उर्फ मुसा व त्याचे साथीदार मनोज विजय अहीरे व रीक्षा चालक रहेमान रमजान पटेल अशा तिघांनी जबरीने मोबाईल हिसकावून घेतला होता. रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहमंद अनिस उर्फ मुसा पिंजारी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कळाली. गुन्हेगार मोहंमद अनिस उर्फ मुसा पिंजारी यास त्याच्या दोघा साथीदारांसह गेंदालाल मिल रीक्षा स्टॉप भागातून अटक करण्यात आली.