यावल : तालुक्यातील अट्रावल येथील 75 वर्षीय वयोवृद्धेचा शेतातील बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत पडल्याने मृत्यू झाला. यावल पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लिलाबाई रामकृष्ण चौधरी (75, अट्रावल, ता.यावल) असे मयत वृद्धेचे नाव आहे.
पाटचारीत पडल्याने मृत्यू
शेतात जावुन येते असे म्हणून लिलाबाई चौधरी या घरातून बाहेर पडल्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न आल्याने अट्रावल गावातील पोलिस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रवींद्र चौधरी, अभय महाजन व काही ग्रामस्थांच्या मदतीने लिलाबाई यांचा शोध घेतला असता बधवार, 11 मे रोजी सकाळी 10 वाजता त्या अट्रावल शिवारातील नामदेव धनजी ढाके यांच्या शेताजवळच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत मृतावस्थेत आढळल्या. त्या वयोवृद्ध असल्याने पाण्याच्या चारीत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मयताचे नातु परेश चौधरी यांनी खबर दिल्याने आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत लिलाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला व वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनी केले.