अट्रावलच्या वृद्धेस सर्पदंश

0

यावल- तालुक्यातील अट्रावल येथील एका 65 वर्षीय महिलेस सर्पसदृष्य दंश झाल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. मिराबाई तुकाराम कोळी असे सर्पदंश झालेल्या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी त्या शेतात काम करीत असतांना त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दंश झाला. त्यांच्यावर यावल ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.