यावल- तालुक्यातील अट्रावल येथे एका 32 वर्षीय विवाहितेला घरात काम करतांना सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. नूतन सुरेंद्र महाजन (32, रा.अट्रावल) या मंगळवारी सायंकाळी घरकाम करीत असताना साहित्याची उठाठेव करताना त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला. त्यांच्यावर तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचार्थ हलवण्यात आले.