अट्रावलवरून बोअरवेलचे साहित्य लंपास ; एकाविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील अट्रावल येथून बोअरवेलचे 50 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवल्याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दयानंद वेडू यादव, (34 धंदा बोअरवेल, रा.बिरनिवास, मेहरुण, अल्वर, राजस्थान) यांनी या प्रकरणी यावल पोलिसात फिर्याद दिली. 30 मे रोजी सायंकाळी सहा ते 31 रोजीच्या सकाळी सात दरम्यान संशयीत आरोपी संशयीत लखीचंद दिनकर कोळी (अट्रावल) याने हे साहित्य लांबवल्याचा आरोप आहे. अट्रावल ग्रामपंचायतीजवळ बोअरवेलचे वाहन उभे असताना संशयीताने जिंदाल कंपनीचे 24 नग स्लीपर कव्हर, ग्राईंडर मशीन तसेच वेल्डींग रॉडची पाकिटे लंपास केली. तपास सहाय्यक फौजदार नागपाल विश्‍वनाथ भास्कर करीत आहेत.