Motor with submersible pump extended from Atraval village यावल : तालुक्यातील अट्रावल गावातील बखळ जागेतून सबमर्सिबल पंप व मोटार असे सुमारे एक लाखांचे साहित्य चोरट्याने लांबवले. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
अट्रावलचे शेतकरी भगवान आत्माराम चौधरी या शेतकर्याने गावातील एका बखळ जागेवर आपल्या शेतासाठीची टेक्समो कंपनीची 15 अश्वशक्तीची विद्युत मोटर व सबमर्सिबल पंप व इतर साहित्य असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल एका ठिकाणी ठेवला मात्र चोरट्यांनी संधी साधली. यावल पोलिसात शेतकर्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अजीज शेख करीत आहेत.