यावल । तालुक्यातील अट्रवाल निमजामाता मंदिराचे कडी कोंडा तोडून देवीच्या दागिण्ययांसह दानपेटीतील 5 ते 10 हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची घटना बुधवार 22 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सकाळच्या सुमारास गावातील काही भाविक मंदिरात दर्शनासाठी आले असता दरवाजाचा कडीकोंडा तोडला असल्याचे दिसून आले. वर्षभरात हि तिसर्यांदा चोरी झालेली असून यात दान पेटीमध्ये पाच ते दहा हजार रुपये तसेच देवीचे दागिणे तोडले व देवीच्या अंगावरील वस्त्रे सुध्दा चोरीस गेले असल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच परिसरात गर्दी निर्माण झाली होती. चोरट्यांनी मंदीरातील साहीत्य इकडे तिकडे फेकून दिले असल्याचे आढळून आले.