अट्रावल येथे जुन्यावादातील पोलीसात दिलेली तक्रार मागे घ्यावी म्हणुन दोन गटात हाणामारी ६ जख्मी ९जणांना पोलीसांनी केली अटक

यावल (प्रतिनिधी ) तालुक्यातील अट्रावल येथे स्वातंत्रदिनी जुन्या वादातुन दोन गटात लोखंडी फडसाव रॉड ने एकमेकांमध्ये प्रचंड हाणामारी सहा जण गंभीर जख्मी झाले असुन पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,या प्रकरणी पोलीसांनी दोघ गटातील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की सौ छायाबाई दिनकर तायडे ,वय ३७ वर्ष राहणार अट्रावल तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की ,दिनांक१५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ,३० वाजेच्या सुमारास अट्रावल गावातील वाल्मिक नगर येथे सार्वजनिक चौकात मोकळ्या जागी फिर्यादीचा मुलगा,पती व फिर्यादी यांना गावातील संशयीत आरोपी हेमंत चंद्रकांत कोळी यांने व चेतन वासुदेव कोळी ,कैलास संतोष कोळी ,निलेश संजय कोळी , चंद्रकांत पंडित कोळी , सरस्वतीबाई वासुदेव कोळी व अंजनाबाई चंद्रकांत कोळी यांनी मिळुन फिर्यादीचा मुलगा रितेश दिवाकर तायडे यास जिवे ठार मारण्याच्या उध्देशाने संशयीत आरोपी हेमंत कोळी यांने आमच्या विरूद्ध दिलेली मागील तक्रार मागे घ्यावी यासाठी जातीवाचक शिविगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करीत लोखंडी फडसा हा डोक्यात मारून गंभीर जख्मी करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला ,म्हणुन वरील सर्व आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दुसऱ्या फिर्यादीत चेतन वासुदेव कोळी यांनी म्हटले आहे की दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ , ३oवाजेच्या सुमारास वात्मीक नगर मधील सार्वजनिक ठिकाणी चौकात मोकळ्या जागेवर एकत्र झेंडा वंदनाचा फोटो काढण्या वरून रितेश दिवाकर तायडे, दिवाकर टोपलु तायडे , पद्दमाकर टोपलु तायडे,चिंतामण पंढरी तायडे ,कृणाल चिंतामण तायडे ,सौ छायाबाई दिवाकर तायडे सर्व राहणार अट्रावल तालुका यावल यांनी चेतन वासुदेव कोळी , हेमंत चंद्रकांत कोळी व चंद्रकांत पंडीत कोळी यांना शिवीगाळ करीत धारधार लोखंडी फडसाने व लोखंडी रॉडने डोक्यास मागील बाजुस मारून गंभीर जख्मी केले म्हणुन दिवाकर तायडे, पद्दमाकर तायडे, रितेश तायडे , कृणाल तायडे, सौ छायाबाई तायडे, गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोघा गटातील ९ जणांना पोलिसांनी अटक केली असुन,पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.