अट्रावल शिवारात गुरे चोरताना एकास पकडले

यावल : तालुक्यातील अट्रावल-सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकास शेतकर्‍याने रंगेहाथ पकडले. ही घटना मंगळवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी, ता.यावल येथील चंद्रकांत विजय तावडे यांची 20 हजार रूपये किंमतीची बैलजोडी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी अट्रावल-सांगवी शिवारातील शेतात बांधली असता अट्रावल गावातील संशयीत किरण दिनकर कोळी हा बांधलेला बैल चोरून नेत असताना शेतकर्‍याने त्यास रंगेहात पकडत चोप देत यावल पोलिसांच्या स्वाधीन केले. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.