अडचणीवर मात करतो तोच यशस्वी – सुरेश साखवळकर

0

तळेगाव  : नवीन व्यवसाय करताना येणार्‍या अडचणीवर मात करून जो व्यवसाय करतो तोच यशस्वी उद्योजक होतो, असे प्रतिपादन रुड्सेट संस्थेचे स्थानिक सलागर समितीचे सदस्य सुरेश साखवळकर यांनी केले. रूडसेट संस्था आयोजित कुकुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निरोप समारंभी प्रसंगी साखवळकर बोलत होते. या प्रसंगी सुनील वाळुंज, सुहास गरुड, रूडसेट संस्थेचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य सोनबा गोपाळे गुरुजी तसेच संस्थेचे प्रशिक्षक संदीप पाटील व हरीश बावचे उपस्तीत होते. 10 दिवसांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळालेले ज्ञानाचा फायदा उपयोग करून घ्यावा. एक आदर्श शेती व्यवसाय कसा करावा. संस्थेत मिळालेले ज्ञान खरोखर शेती पूरक व्यवसाय सुरू करताना उपयोगी पडणारे आहे. यावेळी 30 ते35 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रसंगी संदीप पाटील यांनी सुद्धा शुभेच्या देताना संस्था तुमच्या बरोबर असून तुम्ही एक पाऊल टाका संस्था दोन पाऊल तुमचा पुढे असेल. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षनार्थीना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भापकर यांनी केले तर आभार हरीश बावचे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता गरुड, दिनेश निळकंठ, रवि घोजगे व बाळू अवघडे यांनी केले.