अडवली भुतावली शेत जमिनीवर शेतकरी नाराज

0

नवी मुंबई : महापे लगत असणाऱ्या अडवली भुतावली गावातील शेतकरयांच्या जमिनीच्या चौफेर भराव टाकण्यात येत आहे. यामुळे भयभीत झालेल्या शेतकार्यानी अनेकदा तहसीलदार,जिल्हाधिकारी व मनपाच्या प्रशासनाला अनेकदा पत्र देऊनही कारवाई होत नाही त्यामुळे शेतकरी व मनपा विरोधी पक्षानेता विजय चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन भराव टाकण्याचे काम बंद करावे अशी मागणी केली.

अडवली भुतावली गावा लागत एकूण 147 एकर जमीन आहे,या जमिनी मध्ये स्थानिक शेतकऱयांची देखील 40 एकर जमीन आहे,शेतकरयांच्या जमिनीच्या चौफेर अज्ञात नागरिकांनी पन्नास ते साठ फूट उंचीचा भराव टाकण्यात आल्याने परीसारतीलं तलाव,नाले,नदी पूर्णपणे नाहीसे झाले आहेत,त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची शेती करता येत नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.

सध्या येथील काही जमिनीवर मयुरेश सिम्पोनी प्रायव्हेट कंपनीचा मालक इमारत विकसित करण्याचा डाव खेळत आहे,म्हणून येथील शेतकरी यांनी ठाणे न्यायलाया मध्ये एक याचिका देखील टाकली आहे तसेच नाययालयाने सथागिती दिली असतानाही विकासक इमारत बांधत असल्याचे शेतकरी विजय नाईक यांनी सांगितले.

2003 पर्यंत येथील शेतकरयांच्या नावावर सात बारा असतानाही तो कोरा कसा झाला असाही सवाल पत्रकार परिषदे मध्ये विचारला गेला,2008 मध्ये मनपाच्या महासभेत याच जागेवर पालिकेच्या माध्यमाने व रिलायन्सच्या आर्थिक मदतीने एक सुंदर असा पार्क करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता हा हि प्रश्न अधांतरीच राहिला असल्याचे शेतकऱयांनी सांगितले,विशेष म्हणजे येथे एक विकासक येतो टाऊन शिप बांधण्यास सुरुवाफ करत असतानाही पर्यावरंन विभाग व मनपा प्रशासन गप्प का असाही सवाल पत्रकार परिषदे मध्ये विचारला गेला,शेवटी गरीब अश्या शेतकऱ्या वरील अन्याय थांबवा व न्याय द्या अशेही शेवटी पत्रकार परिषदे मध्ये चौगुले म्हणाले, महापे येथील सरोवर हॉटेल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते विजय गुले, नगरसेवक प्रशांत पाटील तसेच अडवली भुतावली येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.