अडावद। येथील बसस्थानक परिसर व विग्नहर्ता चौक या भागात नेहमी खूप वरदळ असते म्हणून सपोनि जयपाल हिरे यांनी याठिकाणी लोकवर्गणीतून सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी हिरे हे स्वतः आपल्या इतक्या व्यस्त कामगिरीतून वेळात वेळ काढून लोकवर्गणी गोळा करण्यासाठी सुमारे एक महिन्या पासून या परिसरातील लोकांना भेटून वर्गणी गोळा करण्याचे काम स्वतः लोकांकडे जाऊन करीत आहे. या कामात त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी संतोष पारधी यांचा ही मोलाचा वाटा आहे. सपोनि हिरे नागरिकांना भेटून सीसीटीव्ही कॅमेरेचे महत्व विषद करून त्यांच्या उपयोगीते बाबतचे महत्व पटवून वर्गणीसाठी संवाद साधतात तेव्हा तर त्यांच्या बोलण्यात इतकी आत्मीयता असते की जणू ते आपल्याच मूळ गावासाठी हे कार्य करत आहे.
लोकवर्गणी करून केली उपक्रमाची सुरूवात
सपोनि हिरे यांना अडावद पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळायला अवघे सहा महिने झाले आहेत. या अल्पशा काळतच सपोनि हिरेचे गावात गावकर्यांशी जिव्हाळ्याचे संबंध झाले आहेत. सपोनी हिरे जर कोणाशी वार्तालाप करत असतात तर अस वाटकी साहेबांचा आणि अडावदकराच खूप जुने संबंध आहेत. आणि याच स्वभावामूळे साहेब कोणावरही वर्गणीचा शब्द टाकत आहेत तर त्यांना अडावदकर हे स्वखुशीने वर्गणी देत आहेत. आपल्या वेस्त कामगिरीतून वेळात वेळ काढून सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एकवेळेस साहेब काही झालं तर लोकवर्गणी साठी गावात लोकांना भेटल्याशिवाय राहत नाही. या कामासाठी दोन्ही परिसरातील जनता ही भरभरून प्रतिसाद देत आहे. येत्या काही दिवसात दोन्ही परिसरात लवकरच उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसतील गजबजलेल्या भागात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यावर कायदा व सुवेवस्था अबाधित राखण्यासाठी अधिक मदत होणार आहे यात शंका नाही.