अडावदजवळ अ‍ॅपेरिक्षाचा अपघात

0

जळगाव । चोपड्याकडून अडावदकडे येत असलेल्या अ‍ॅपेरिक्षाचा रात्री 8 वाजेच्या सुमारास अडावदजवळ रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता जखमींची गंभीर अवस्था असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चोपड्याकडून अ‍ॅपे रिक्षा क्र.एम.एच-19 ए.एक्स-4317 ही अडावदकडे जात असतांना अडावदजवळ हा अपघात झाला आहे. रिक्षाचे स्टेरिंग तुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. यामध्ये रिक्षाचालक व एक महिला गंभीर जखमी झाले आहे असून नदीम बेग, अफजल खान, ताहेर खान यांनी मदत कार्य केले.