अडावद । अडावद चोपडा या महामार्गावर ट्रक व मोटारसायकल समोरा समोर अपघात झाल्याने त्यात मोटारसायकल चालक हा जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. चोपड्याकडून अडावदकडे येणारी ट्रक क्र.(एमएच 18- एम 6748) व अडावदकडून चोपड्याकडे जाणारी मोटारसायकल क्र.(एमपी 46 एमएल 2998) याच्यात अडावद गावाला लागून असलेले शिवशक्ती ट्रेडसच्या समोर ट्रक व मोटारसायकल यांचे समोरा समोर अपघात झाल्याने मोटारसायकलवरील चालकाच्या डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने तो जागीच ठार झाला.
ट्रक चालक फरार
दुसर्याच्या चेहर्याला जबर मार आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला. दोन्ही मोटारसायकल स्वार हे कोण आहेत आणि कुठले आहेत याचा अजून तपास लागलेला नसल्याने या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे व पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक ही ताब्यात घेतली. मात्र ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.