अडावदला पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड : पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

In the middle of the night, gambling took place in the field : Adavad police raided and arrested 14 gamblers; Assets worth fifty four lakhs seized चोपडा : तालुक्यातील अडावद येथील अलीम अली जहुर अली काझी यांच्या शेतात अडावद पोलिसांनी धाड रंगात आलेला जुगाराचा डाव उधळत एक लाख 71 हजार रुपयांच्या रोकडसह दुचाकी मिळून सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 15 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईने अवैधरीत्या जुगार खेळणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

जुगाराचा डाव उधळला
अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे हे आठ दिवस रजेवर असून जळगाव नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. अलीम अली जहूर अली काझी यांच्या शेतात अनेक वर्षांपासून पत्त्यांच्या क्लब सुरू असताना कारवाई होत नसतानाच या क्लबवर मोताळे यांनी त्यांच्या पोलिस कर्मचार्‍यांसह सोमवार, 17 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास धाव टाकल्याने जुगार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

15 जुगार्‍यांसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
शेतात जाऊन अलीम अली जहुर अली काझी यांच्या पत्त्याच्या क्लबवरून पोलिसांनी चार मोटार सायकलींसह तीन लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात एक लाख 75 हजारांच्या रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी अलीम अली जहुर अली काझी, भाऊसाहेब प्रकाश पाटील, विनोद भगवान पाटील, दीपक रघुनाथ जोशी, जुनेद शेख फिरोज, रामचंद्र रुपचंद्र महाजन, अरुण वामन पाटील, इक्बाल शहा मुसा शहा लिलाधर कैलास साळुंके, लिलाधर कैलास साळुंखे, रमाकांत विठ्ठल डोळे, भरत शालीक भील, जिगर सुरेश कोळी, प्रवीण धुडकू महाजन अशी अटकेतील संशयीतांची नावे असून संशयीतांना समजपत्र देवून सोडण्यात आले. तपास पोलिस नाईक शरीफ तडवी करीत आहे.