जळगाव- अडावद शिवारातील शेतातून तक्रारदार सुरेश व्यंकटलाल कासट (सुभाश चौकाजवळ, अडावद) यांच्या मालकिचे 50 हजार रुपये किंमतीचे रोटाव्हेटर 14 जानेवारी रोजी चोरीस गेले होते. या प्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून यशवंत रघुनाथ कोळी (23, इंदिरा नगर, न्यू प्लॉट, अडावद), शिवदास नारायण कोळी (35,इंदिरा नगर, न्यू प्लॉट, अडावद) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी चोरीची कबुली देत रोटाव्हेटर काढून दिले तर आरोपींना अडावद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील, सतीश हाळनोर, योगेश पाटील, बापू पाटील, सुशील पाटील, प्रवीण हिवराळे, मनोज दुसाने, मुरलीधर बारी, गफूर तडवी आदींनी ही कारवाई केली.