अडावद । येथील इंदिरानगर प्लॉट भागात घाणीचे साम्राज्य पसरले असुन गटार ब्लॉक झाल्याने गटारीमधून पाणी रस्त्यावर आले आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून नागरीकांना याचा पाण्यातून रहदारी करत ये-जा करावी लागते. परिणामी स्थानिक रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. गटारींची वेळोवेळी सफाई होत नाही, सांडपाण्याचा निचरा होत आहे. परिणामी गटारी साचुन राहतात. त्यामुळे दुर्गधी पसरुन डास, मच्छर आदींची उत्पती होत असल्याने साथीचे आजार वाढीस लागुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळाबली आहे.
येथील प्रभाग क्रमांक 6 मधील इंदिरानगर प्लॉट भागात स्वच्छतेचे धिंडवणे निघाले असुन हनुमान मदीराजवळील गल्लीत गटारी तुंडूब भरल्याने गटारींचे पाणी पार रस्त्यावर साचु लागले आहे. अशा दुर्गंधीयुक्त पाण्यातुन लहानमुले, महिला, वयोवृध्दांना मार्गक्रणम करावे लागत आहे. तर काहींच्या घरात गटारीचे पाणी शिरत आहे. यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वारंवार समस्या मांडुनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर गटारिचे पाणी साचुन रहदारीस अळथळा होत असेल तर पावसाळ्यात स्थानिक रहिवाश्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागेल याची प्रचिती येत होती.
ग्रामप्रशासनावर बरसल्या संतप्त महिला
प्लाँट भागातील गटारीची समस्या पाहण्यासाठी आज सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास ग्रामविकास आधिकारी प्रदिप धनगर, सचिन महाजन इंदिरानगर प्लाँट भागात गेले असता स्थानिक रहीवासी ग्रामप्रशासनावर चांगल्याच बरसल्या. आमच्या भागात कुणीही लक्ष देत नाही, गटारी काढल्या जात नाही, रस्त्यावर गटारीचे पाणी साचते त्यातुनच चालावे लागते. यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. आतातरी आमच्या समस्या सुटतील का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत महीला व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मदतअली सैय्यद, हरिष पाटील यांनीही भेट देवुन पाहणी केली.
यांचा होता सहभाग
याप्रसंगी श्रीधर तायडे, भगवान कोळी, रविंद्र तायडे, राजेंद्र पाटील, सागर ठाकुर, लोटन कोळी, संजय महाजन, संदिप कोळी, योगेश कोळी, लक्ष्मण कोळी यांसह हमीदाबाई तडवी, हलमाबाई तडवी, बानुबाई तडवी, गुलशनबाई तडवी, सुमनबाई तडवी, रेखा तायडे, गिताबाई कोळी, सिमा अहिरे, रत्नाबाई महाजन आदिंनी ग्रामविकास अधिकारी प्रदिप धनगर, सचिन महाजन, मदतअली सैय्यद, हरिष पाटील यांच्याकडे गर्हाणे मांडले यावर तात्काळ कार्यवाही करुन तुमची समस्या सोडवीतो असे आश्वासन ग्रामविकास प्रदिप धनगर यांनी दिले.