अडावद आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

0

अडावद:येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलिप पोटोडे यांनी धावती भेट दिली.

वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटिल यांच्यासह कम्युनिटी आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश चौधरी यांचेशी कोरोना पार्श्वभूमीवर हितगुज करून सविस्तर आढावा घेतला. अधिकारी वा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक (लवंग,दालचिनी, काळी मिरी,लिंबू, तुळशीचे पाने, अद्रक) काढा दिवसातून तीन वेळा (सकाळ/दुपार/संध्याकाळ) देण्याचे संगितले, तसेच सर्वानी नियमितपणे कोमट गरम पाणी पिण्यास सांगितले. जोखमीच्या कार्यक्षेत्रातील करावयाच्या उपाययोजना व अडीअडचणी जाणून घेऊन, सॅनिटायझर, ग्लोज,मास्क, इत्यादी गोष्टीची आवश्यकता असल्यास जळगांव कार्यालयातुन सोमवारी घेण्या बाबत सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा साथरोग विस्तार अधिकारी-अजय चौधरी, आरोग्य सहाय्यक-पी.एस.लोखंडे, प्रकाश पारधी, आरोग्य सेवक-विजय देशमुख,सुधीर चौधरी,दिनेश वाघ व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.