अडावद उर्दु हायस्कुलात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

0

अडावद। अ‍ॅग्लो उर्दु हायस्कुल या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. अध्यक्ष हाजी फजल शेठ यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण वाढावे, त्यांच्यामध्ये खेळाडु वृत्ती निर्माण व्हावी, चांगले खेळाडू तयार व्हावे, या उद्देशाने अ‍ॅग्लो उर्दु हायस्कुल अडावद येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात फुटबॉ, बुद्धिबळ, कबड्डी, खो- खो, कुस्ती, क्रीकेट, अशा वैयक्तिक व सादीक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रत्येकी पहिले तिन आलेल्या अध्यक्ष हाजी फजलसेठ, सचिव सईद खान, उपाध्यक्ष जहीरोद्दीन शेख, तथा संस्थापक अध्यक्ष हाजी पिरू सेठ, उपाध्यक्ष कबिरोद्दीन शेख, सचिव जोहर अली काझी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्वच्छेतविषयी घेतली शपथ
मुख्याध्यापक पटेल यांनी विद्यार्थ्यांसबोर आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, शरीर हे देवाने माणसाला दिलेली एक मोठी देणगी आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आणि शरीराच्या सुरक्षेकरिता खेळ आणि व्यायाम आवश्यक आहे असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मिशनचा प्रचार व प्रसिद्ध ग्रामीण महाराष्ट्रात घराघरात होणे आवश्यक आहे.

या अभियानासाठी शाळेतील मुले, मुली हे निश्‍चितच स्वच्छतादूत म्हणून काम करून शकतील शाळेतील प्रत्येक मुलामुलीने आपल्या आई – वडीलांकडे घरात शौचालय बांधून वापराचा आग्रह धरल्यास महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम लवकरच सिद्धीस जाण्यास मदत होईल म्हणून 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून तशा प्रकारची शपथ घेण्याचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.

ध्वजारोहणास यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पत्रकार रियाज शेख, विजय साळुंखे, नरेंद्र खंबायत, तसेच शालेय समिती चेअरमन अय्युब खान, रऊफ कुरेशी, रज्जाक जनाब, अ. कादर शेख, ताहेर शेख व गावातील नागरिक जहाँगीर पठाण, सुभान तडवी, अलीयार तडवी, अजीम शमसोद्दीन, शरीफ गुलजार, हाफीज मलिक, रियाज अली, मजहर शेख, अमजद खान, अब्दुल बारी, उमर फारूक, दौलत साळुंखे आदी उपस्थित होते. प्रस्तावना शब्बीरसर व सूत्रसंचालन सैय्यद महेमुद सर यांनी केले तसेच यशस्वीतेसाठी शालेय कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.