अडावद ग्रामपंचायतीचा गलथान कारभार

0

अडावद । अडावद गावात एकूण 14 हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत. गत तीन वर्षापासून ही बसविण्यात आले असून त्या लॅम्प देखरेखीची जवाबदारी अडावद ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेला लेखी स्वरूपात आम्ही करू असे दिले असून तरी त्यांची देखरेख ही रामभरोसेच दिसून येत आहे गावात बहुतेक हायमोस्ट लैम्पचे काही ट्यूबलाईट बंदावस्थेत आहेत. तर काहींचे बंद चालू असणाच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. अडावद बसस्थानक परिसरात जे हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले आहे.

त्याचा मेन स्विच जमिनीपासून तिन फुट अंतरावर खंब्यावर असल्यामुळे या खंब्याला कोणीही व्यक्तीचा हात लागला तर कोणत्याही क्षणी जिवीतहानी होवू शकते. तसेच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून पाण्यामुळे खंब्याजवळील जमिनीजवळही शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या परिसरात नेहमी नागरीकांची वर्दळ असते तिथे विद्युत तार हे खुल्या स्थित आहे म्हणून जीव जाण्याचा संभव नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून नुकसान होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.