अडावद ग्रामपंचायतीवर नागरीकांचा हंडा मोर्चा

0

अडावद । पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीवर आज सकाळी हांडा मोर्चा काढला. यावेळी मात्र सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने गोंधळ उडाला. येथिल वार्ड क्र 4 मधील मोमिन मोहल्ला, नेहरु चौक, शिंपी गल्ली व पाटील वाड्यात पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीवर हांडा मोर्चा काढाला. परंतु ग्रामपंचायतीत कोणीही पदाधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप अजून तीव्र झाला.

वारंवार सांगुनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने कुणापुढे सांगगायचे असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर सरपंच पती सचिन महाजन यांच्याकडे मोर्चेकर्‍यांनी आपली गराणे मांडली. दोन दिवसात कार्यवाही करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने शांतता झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अमिनाबी तडावी, शे. ताहेर शे. रज्जाक, हनुमंत महाजन, चंद्रकांत पाटील, शकीलोद्दीन शेख आदी उपस्थित होते. तर मोर्चात सद्दाम पिंजारी, जुनेद खान, माधवराव गायकवाड, प्रविण गायकवाड, राकेश चौधरी, अन्सार खान, शकील पिंजारी, जाकीर खान, महेमुद पिंजारी, आबिद खान, हारुन शहा, ईरफान खान, अमजद खान जुबेर खान, सईद खान यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.