चोपडा । जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे अडावद-धानोरा गटातील गटासाठी दिलीप युवराज पाटील व गणासाठी अमिनाबी रज्जाक तडवी यांना उमेदवारी देण्यात आली असुन त्यांची गत काळात कामे बघुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आली. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह पाहून पक्षाने चांगले नेतृत्व करणारे उमेदवार दिले असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध- सुरेश पाटील
देशमुख वाड्यातील संकट मोचन मारोती मंदीरात जावून माजी सभापती विठ्ठलराव देशमुख यांच्याहस्ते नारळ फोडून प्रचार रॅलीला सुरूवात करण्यात आली आहे. सदरील रॅली पारधी वाडा, खालच्या माळी वाडा, वरच्या माळी वाडा, संपूर्ण इदिरानगर, शिवाजी रोड, ग्रामपंचायत गल्ली, मन्यार मोहल्ला, बसस्थानक परीसर, आदिवासी पाडा आदी परीसरात जाऊन मतदारांच्या भेटीला जाऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. वीज, पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा व गरजांवर अधिक भर पडणार असून विकास कामांकडे अधिक भर देणार आहे. या पुर्वीही गटात व गणात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आले असून विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी गटातील उमेदवार दिलीप युवराज पाटील खर्डी व अडावद गणातील महिला उमेदवार अमिनाबी रज्जाक तडवी यांना साथ देऊ, असे प्रचार रँली समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी सभापती विठ्ठलराव देशमुख यांनी सांगितले.
प्रचार रॅलीत यांचा होता सहभाग
प्रचार रॅलीत यावेळी चंद्रशेखर पाटील, वासुदेव देशमुख, माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील, कृउबास संचालक दिनकर देशमुख, डिगंबर पाटील, पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते गोदावरीताई देशमुख, कैलास पाटील, भागवत पाटील, डॉ.सुधाकर पाटील, माजी उपसरपंच वजाहतअली काझी, हाजी पीरु शेठ, सलिम खाँ न्याजोद्दिन हाजी फजल शेठ, सईद खाँ पठाण, शेख.झहिरोद्दिन शे. हाषम,शे.कबीरोद्दिन दिलफरोज, याकुब अली काझी, जहांगीर पठाण, लायकअली काझी, जावेद खाँ. हबीब खाँ, सलिम कुरेशी अमजद खाँ रऊफ खाँ मा.प.स.सदस्य शे. ताहेर शे. रज्जाक, कालु मिस्तरी, शेख शकीलोद्दिन समशोद्दिन शेख रियाज शे. कबीरोद्दिन, आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.