अडावद पीक संरक्षक संस्थेच्या चेअरमनपदी वजाहत अली काझी 

0

अडावद – येथील अडावद पीक संरक्षक संस्थेच्या चेअरमनपदी वजाहतअली मीरजानअली काझी तर व्हा. चेअरमन पदी सुनंदाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १९ रोजी सकाळी १० वाजता पीक संरक्षक संस्थेच्या कार्यालयात चेअरमन व्हा चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली यात चेअरमन पदासाठी वजाहतअली मीरजानअली काझी व  व्हा. चेअरमन पदी सुनंदाबाई युवराज पाटील यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी संचालक भिमराव ओंकार महाजन, शेख रईस शेख इसा, आधार सुका महाजन, योगेश सुरेश महाजन, प्रदीप रामभाऊ देशमुख , युवराज मुरलीधर पाटील, भूषण प्रभाकर चव्हाण , पंढरीनाथ गंगाराम पाटील, साहेबराव रामराव सोनवणे , संजय रतन साळुंखे, वैजयंताबाई विक्रम महाजन हे उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी तर त्यांना सचिव प्रकाश मगरे यांनी सहकार्य केले.